Breaking
Updated: मार्च 21, 2026
वारोळ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वारोळा येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धाड टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वारोळा येथील एका घरात महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला.या कारवाईसाठी एका डमी ग्राहकाचा वापर करण्यात आला होता. डमी ग्राहकाने वेश्या गमनासाठी पाचशे रुपयांची मागणी केली असता, आरोपी अलका बाबुराव हडागळे (वय ४५, रा. वारोळा) हिने पैसे स्वीकारून त्याला एका खोलीत पाठवले. डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरावर छापा टाकला. यावेळी त्या खोलीतून परभणी जिल्ह्यातील ४४ वर्षीय पिडीत महिलेची सुटका करण्यात आली.
तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपी अलका बाबुराव हडागळे आणि रामा मसु गायकवाड (रा. वारोळा) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत होते. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पाचशे रुपयांपैकी दोनशे रुपये हे दोघे स्वतःकडे ठेवून पीडित महिलेला केवळ तीनशे रुपये देत असत. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि निरोधची पाकिटे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध स्त्रीया व अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.