Breaking
Updated: जून 20, 2026
जमिनीच्या वादातून सख्ख्या भावावर लोखंडी गजाने हल्ला, साळींबामधील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी: तालुक्यातील साळींबा येथे जमिनीच्या कारणावरून सख्ख्या भावावर लोखंडी गजाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १९ जून २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर हा प्रकार घडला. वडिलांच्या नावावर असलेली ३० गुंठे जमीन माझ्या नावावर का करून देत नाही, अशी कुरापत काढून आरोपीने फिर्यादी व त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब उत्तमराव मायकर हे आपल्या घरासमोर उभे असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक उत्तमराव मायकर तिथे आला. त्याने जमिनीच्या हक्कावरून वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर अशोकने बाळासाहेब यांना शिवीगाळ करत तोंडावर चापटबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने बाजूला पडलेला लोखंडी गज हातात घेऊन बाळासाहेब यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या वृद्ध वडिलांनाही आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी वडवणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार उबाळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.