Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

दिव्यांग व्यक्तीला फरशीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: माजलगाव ते पात्रुड रोडवर लवूळ फाट्याजवळ मळीच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

विमल प्रभू मस्के (वय ५६, रा. क्रांतीनगर, केज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा बळीराम प्रभू मस्के (वय ३५) हा माजलगावहून केजकडे आपल्या दुचाकीने (क्रमांक MH 44 F 1131) जात होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या मळीच्या टँकरने (क्रमांक MH 43 U 7610) त्याला जोराची धडक दिली. या अपघातात बळीरामचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

माजलगाव ग्रामीण पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार जेठेवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts