Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने जीवघेणा हल्ला; ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 31, 2026

By Vivek Sindhu

ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगांव: माजलगांव शहरातील इंदिरा नगर भागात एका दारुड्या मुलाचे त्याच्या आईसोबत चाललेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जखमी व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी संगिता अंसाराम भिसे (वय ३५, रा. इंदिरा नगर माजलगाव) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २९ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या ओळखीच्या जकियाबाई या त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यांचा मुलगा आरोपी शेख समीर हा दारूच्या नशेत त्यांना मारहाण करत असल्याने त्यांनी मदतीसाठी फिर्यादीला बोलावले होते. संगिता आणि त्यांचे पती अंसाराम हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपी समीरने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रागाच्या भरात आरोपीने अंसाराम यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर आपल्या जवळील चाकू काढून अंसाराम यांच्या पोटावर व बरगडीवर तीन वार केले. या हल्ल्यात अंसाराम गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने माजलगाव येथील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.


Categories

Recent Posts