Breaking
Updated: जानेवारी 27, 2026
माजलगाव-पाथरी रोडवर भीषण अपघात; कार उलटून चालकाचा मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव ते पाथरी रोडवर वेगात जाणारी कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात निवृत्ती भाऊसाहेब खेडेकर, वय २५ वर्षे, राहणार शिराळा, जिल्हा परभणी, या कार चालकाचा मृत्यू झाला आहे. फिर्यादी अमोल कैलास राठोड आणि त्याचे मित्र वैष्णव शेजुळ व अभिषेक सोनवणे हे सर्वजण निवृत्तीच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच ०४ एलएच ७४४८) माजलगावकडे जात होते. रामनगर तांड्याजवळ चालकाने भरधाव वेगात अचानक ब्रेक लावल्याने कार रस्त्याच्या खाली गेली आणि दोन ते तीन वेळा पलटी झाली.
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती खेडेकर याने स्वतःच्या आणि इतरांच्या मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याबद्दल ही नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार बळवंते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.