Breaking

घरासह कपड्याचे दुकानाला आग

Updated: जून 20, 2026

By Vivek Sindhu

घरासह कपड्याचे दुकानाला आग

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- तालुक्यातील धावडी येथे शनिवारी सकाळी सुमारे 10 च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत प्रशांत रघुनाथ मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक झाले. घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आगीचे कारण समोर येईल.

दुर्घटनेत घरातील फर्निचर, टीव्ही, कुलर, वॉशिंग मशीन तसेच दुकानातील साड्या व इतर कपड्यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नष्ट झाले.

प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून या दुर्घटनेत अंदाजे एक लाख 61 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे घरगुती साहित्य आणि व्यावसायिक माल दोन्हीचे मोठे नुकसान झाल्याने मस्के कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करून संबंधित अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Categories

Recent Posts