Breaking

राजकीय वैमनस्यातून तरुणावर हल्ला; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: जून 20, 2026

By Vivek Sindhu

राजकीय वैमनस्यातून तरुणावर हल्ला; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील मुळुकवाडी येथील विठ्ठल गडाच्या पायथ्याशी राजकीय कुरापतीतून एका तरुणाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना लोखंडी कत्ती, गंज व काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आमच्या पक्षाच्या लोकांच्या फाईलवर सह्या का करत नाही, अशी कुरापत काढून ही मारहाण करण्यात आली. १५ जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी सतीश प्रल्हाद साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम मोतीराम कोकाटे, ज्ञानेश्वर अर्जुन वाघ, उत्तरेश्वर बबन कोकाटे यांच्यासह मुळुकवाडी आणि मानमोडी येथील १३ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सतीश साबळे व त्यांच्या साक्षीदारांना विठ्ठल गडाच्या पायथ्याशी गाठले. राजकीय फाईलवर स्वाक्षरी न केल्याचा राग मनात धरून आरोपींनी धारदार लोखंडी कत्ती, गंज आणि लाकडी काठ्यांनी फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी आणि साक्षीदार गंभीर जखमी झाले असून आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळबळ उडाली असून गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गर्जे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts