Breaking
Updated: मार्च 14, 2026
दाजीची समजूत घालण्यासाठी गेलेल्या मेहुण्यावर कुऱ्हाडीने हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर: आपल्या बहिणीला मारहाण करणाऱ्या दाजीला समजून सांगण्यासाठी गेलेल्या भावावरच कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना गवारी येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बाबुराव कदम याच्याविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनुवा मनोहर पवार (वय ४५, रा. नेकनूर) यांना माहिती मिळाली की, त्यांची बहीण आणि तिच्या पतीमध्ये भांडण सुरू आहे. बहिणीला वाचवण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी पवार हे गवारी येथे गेले होते. तिथे पोहोचल्यावर बहिणीचा पती बाळासाहेब बाबुराव कदम याने रागाच्या भरात पवार यांच्या डोक्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला.
या हल्ल्यात पवार रक्तबंबाळ झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कौटुंबिक वादाचा भयानक चेहरा समोर आला आहे. पोलीस अंमलदार बागर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.