Breaking

गाडीच्या चावीवरून वाद; लाकडी दांडक्याने तरुणावर हल्ला

Updated: मार्च 14, 2026

By Vivek Sindhu

लाकडी दांडक्याने तरुणावर हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी: गाडीची चावी का घेतली, असे विचारल्याचा राग आल्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना वडवणी येथे घडली आहे. याप्रकरणी अरुण साहेराव चव्हाण (वय ३३) यांनी हनुमंत महादेव इचके याच्याविरुद्ध पोलिसांत धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपळी येथील एका लाकडाच्या दुकानासमोर हा प्रकार घडला. फिर्यादी अरुण चव्हाण यांनी आपली गाडीची चावी आरोपीने का घेतली, असा प्रश्न विचारला होता. यामुळे संतापलेल्या हनुमंत इचके याने दुकानात असलेला लाकडी दांडका उचलून चव्हाण यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

या घटनेनंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. वडवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस अंमलदार जायभाये अधिक तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts