Breaking
Updated: मार्च 13, 2026
आधार माणुसकीतर्फे विधवा मातांचा सन्मान व ब्लँकेट वाटप
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथे मंगळवारी (दि.१४) महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या विविध स्पर्धेत महिलांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा आनंद घेतला. यानिमित्त आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्फे विधवा मातांचा सन्मान करून त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
उद्योजक प्रदीप ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या
सन्मान व भेट वस्तू
यांनी मिळवले पारितोषिक
सावित्रीबाई व महात्मा फुलेंनी संघर्ष केल्याने महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार दिल्याने महिलांना न्याय मिळाला. आता समाजानेही महिला, पुरूष ही विषमता दूर करून महिलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे असे आवाहन प्रा. राजपंखे यांनी केले. सविता बुरांडे यांचेही भाषण झाले. शिवानंद गुळवे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकन्या जाधव व यशश्री दत्ता माने यांनी मनोगत व्यक्त केले. रामकृष्ण पवार, अनंत निकते व गावातील महिलांनी उपस्थितांचे स्वागत केले.