Breaking

उभ्या मोटर सायकलीला दिली मोटार सायकलीने धडक : अपघातात एकाचा मृत्यू 

Updated: मार्च 12, 2026

By Vivek Sindhu

अपघातात एकाचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटार सायकलीला दुसऱ्या एका भरधाव वेगातील मोटार सायकलीने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. 

हा अपघात केज-मांजरसुंबा रस्त्यावर सारणी पाटीच्या पुलाजवळ घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

धोत्रा ता. केज येथील संतोष आश्रुबा गित्ते यांचे बरड फाटा मोटर दुरुस्ती व विक्रीचे दुकान होते. २६ फेब्रुवारी रोजी रात्री १०:१५ ते १०:३० वा. च्या दरम्यान संतोष गित्ते व त्यांचा मित्र जिवन राजेभाऊ जाधव (रा. धोत्रा ता. केज) हे दोघे मोटार सायकल क्र. (एम एच-०४/ई सी-६२१७) रा. सारणी (सां.) तालुका केज येथून बरड फाट्याकडे येत असताना सारणी पाटीच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभा करून उभे असताना मस्साजोग कडून भरधाव वेगात आलेल्या मोटार सायकल क्र. (एम एच-४४/ए बी-९७९३) ला धडक दिल्याने संतोष गित्ते हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बीडच्या सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून संतोष आश्रुबा गित्ते यांना मृत घोषित केले. धडक देणाऱ्या मोटार सायकल चालक संतोष साहेबराव लाड (रा. लाडेवडगाव ता. केज) याने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे,ल भरधाव वेगात चालवून धडक दिल्याची तक्रार दादासाहेब गित्ते यांनी दिल्या वरून संतोष लाड याच्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याचा तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.


Categories

Recent Posts