Breaking
Updated: मार्च 12, 2026
चुलत भावासह दोघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – जुन्या भांडणाच्या कारणा वरून मोटार सायकली वरून जातलेल्या एकाच्या पायावर तलवारीने वार करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चुलत भावासह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हेवाडी ता. केज येथील वाहन चालक महादेव प्रकाश आघाव वय (२६ वर्ष) यांचे पाच दिवसा पूर्वी शेतात ट्रॅक्टर घालण्याच्या कारणा वरून त्यांचा चुलत भाऊ अशोक मच्छिंद्र आघाव याच्या सोबत भांडण झाले होते. याच भांडणाच्या कारणा वरून ११ मार्च रोजी दुपारी महादेव आघाव हे लव्हुरी येथून गावाकडे मोटार सायकल वरून जात असताना त्यांचा चुलत भाऊ अशोक आघाव व त्याचा साथीदार बालाजी पांडू तांदळे (रा. कोरेगाव) हे रस्त्यावर उभे होते. चालत्या मोटर सायकलवर असलेल्या महादेव आघाव यांच्या पायावर बालाजी तांदळे याने तलवारीने वार केला तर अशोक आघाव याने ट्रॅक्टर का अडवले ? असे कारण करून शिवीगाळ करीत तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देत निघुन गेले.
महादेव आघाव यांनी तक्रार दिल्या वरून बालाजी तांदळे, अशोक आघाव या दोघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२२/२०२६ भा. न्या. सं. ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) सह शस्त्र प्रतिबंधक कलम ४, २५ गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार हनुमान मुंडे हे करीत आहेत.