Breaking
Updated: मार्च 12, 2026
मारहाणीत महिलेचा दात पडला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- बांधाच्या कडेला ऊस लावल्या वरून मायलेकास लाथा बुक्याने व दगडाने मारहाण केल्याने या मारहाणीत तोंडावर दगड लागल्याने महिलेचा एक दात पडला आहे.
नांदूरघाट ता. केज येथील बाळु उर्फ राम शिवदास जाधव वय (२५ वर्ष) व त्याची आई सुशीला जाधव हे दोघे शेतात १० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता शेतात ऊस लावत होते. बांधाच्या कडेला ऊस लागवड केल्याच्या कारणा वरून लक्ष्मण रामराव जाधव, पुष्पा लक्ष्मण जाधव, सतिश लक्ष्मण जाधव, संजय लक्ष्मण जाधव या चौघांनी शिवीगाळ करून बाळू जाधव यास लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी त्यांची आई सुशीला जाधव या भांडण सोडविण्यास आल्या असता त्यांना खाली पाडून पोटात व पाठीत बुक्या मारल्या. तर सतीश जाधव याने त्यांच्या तोंडावर दगड मारल्याने एक दात पडला असून दुसरा हलत आहे. अशी तक्रार बाळू जाधव यांनी दिल्या वरून लक्ष्मण जाधव, पुष्पा जाधव, सतीश जाधव, संजय जाधव या चौघा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं १२५/२०२६ भा न्या सं ११५(२), ११७(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार राजू वंजारे हे करीत आहेत.