Breaking
Updated: मार्च 7, 2026
माजलगाव ग्रामीण रुग्णालयाला मुरुमाचा विळखा; रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: ग्रामीण रुग्णालय सध्या व्यवस्थापनाच्या कमालीच्या दिरंगाईमुळे चर्चेत आले आहे. रुग्णालयाच्या नवीन खोदकामातून निघालेला मुरूम इतरत्र न हलवता तो थेट रुग्णालय परिसरातच साठवून ठेवल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराने वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी हा मुरूम रुग्णालयाच्या अवतीभोवती टाकल्याचा आरोप होत असून, यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. माजलगाव शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या आशेने येथे उपचारासाठी येतात, मात्र धुळीचा त्रास आणि अडथळ्यांमुळे त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन हा राडारोडा हटवावा, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.