Breaking

तर पाताळात गाढण्याची तयारी ठेवा-अजित अभ्यंकर

Updated: मार्च 7, 2026

By Vivek Sindhu

तर पाताळात गाढण्याची तयारी ठेवा-अजित अभ्यंकर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

लाभाशिवाय सामाजिक ऐक्याचा महोत्सव – हभप श्यामसुंदर सोन्नर

सिरसाळा – देशात दरवर्षी लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या होत आहेत त्यामध्ये महाराष्ट्र विशेषता: मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा लक्षणीय व अधोरेखित करण्याजोगा भाग आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता जुलमी धोरणकर्त्याच्या विरोधात वामन अवतार घेऊन धोरणकर्त्याच्या मस्तकावर पाय ठेवून पाताळात गाढण्याची तयारी करावी असे आवाहन अर्थतज्ञ अजित अभ्यंकर यांनी केले तर हा लाभाशिवाय सामाजिक एकोपा निर्माण करणारा हा महोत्सव असल्याचे हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी काल्याच्या कीर्तन महोत्सव प्रसंगी व्यक्त केले.

जगतगुरु तुकाराम बीज निमित्त समूह गाव शेतकरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या विचार मंचावर अर्थतज्ञ अजित अभ्यंकर हे बोलत असताना म्हटले की, देशभरात कृषी संकट मोठ्या प्रमाणावर गंभीर समस्या बनली आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतात आयात निर्यात धोरण कृषी मला हमीभाव यासह इतर कारणास्तव बळीराजा हतबल झालेला आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांची समस्या अतिशय भयानक असून आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवन मरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. मानवाच्या विकासाचा केंद्र बिंदू हा शेती असून धोरणकर्त्यांनी कृषीनीती आणि धोरणे बदलून टाकली आहेत. 2016 साली तयार केलेल्या दिवाळखोरी कायद्यानव्ये उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जाते मात्र शेतकऱ्यांना नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली गळाल्या फास लावावा लागत असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी आता  वामन अवतार घेऊन कृषीविरोधी धोरणे राबविणाऱ्या धोरणकर्त्याला पातळात गाढण्याची वेळ आली असून एकजुटीने या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन अर्थतज्ञ अजित अभ्यंकर यांनी केले. तर कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारोप हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने संपन्न झाले. यावेळी त्यांनी सांगितले कौरव-पांडवांत ज्या प्रमाणे नीती-अनिती मध्ये युद्ध झाले ते धर्मयुद्ध हे एक धर्म दुसऱ्या धर्माच्या  विरोधात नव्हते   आजमितीस मात्र जाती-धर्मात  लावून जीवन मरणाचा प्रश्नांपासून सामान्य लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम अपप्रवृत्ती करत आहेत.या ही परिस्थितीत हा कीर्तन महोत्सव शेतकऱ्यांचा जीवनात शेतकऱ्यांच्या एकजुटी मधून आंनद निर्माण करणारा सोहळा असून सामाजिक सलोखा हेच महत्त्वाचे ही संतांची शिकवण या कीर्तन महोत्सवाने समाजमनावर निर्माण होत आहे. 

या शेतकरी कीर्तन महोत्सवाचा समारोप प्रसंगी उपस्थित असलेले ऑड.अजय बुरांडे यांनी करताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पहिल्या वृत्तपत्राचा दाखला देत 

“काय करुन आता धरुनिया भीड ।

निःशक हे तोंड वाजविले ॥१॥

नव्हे जगी कोण मुकियांचा जाण ।

सार्थक लाजोनी नव्हे हित ॥२॥ 

आता आपले मुकेपण धरून ठेवण्यात काही अर्थ नाही, आपले तोंड उघडून आपले विचार मांडले पाहिजेत. जगात कोणाही मुका नाही, आपले हित साधण्यासाठी लाज बाळगू नये या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकाची सुरुवात करून समाजातील उपेक्षित, शोषित वर्गाला आपले विचार मांडण्यासाठी प्रेरित करणे, त्यांचा आवाज बुलंद करणे ही संतांची शिकवण असल्याचे सांगत संतांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.


Categories

Recent Posts