Breaking

मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमदारकी रद्द करा

Updated: मार्च 6, 2026

By Vivek Sindhu

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- आहिल्यानगर येथे हिंदू जनसभेतून भोसरी (जि.पुणे) मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रात दंगली घडवून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल लांडगे यांची आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपाइं (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी बुधवार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यासंदर्भात अक्षय युवराज भुंबे (मराठवाडा विभागीय अध्यक्ष, रिपाइं (खरात गट) यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भोसरी (पुणे) मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी नुकतेच आहिल्यानगर येथे हिंदू जनसभेमध्ये भाषण करताना मला विशिष्टांची मते नकोत, आमदारकीला पडलो तरी चालेल असे वक्तव्य जाहिर सभेमधून करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. ज्यामुळे भविष्यात हिंदू-मुस्लिम समाज एकमेकांसमोर येऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आम्हाला वाटते. तसेच महेश लांडगे हे विद्यमान आमदार असून त्यांना जाहिर सभेमधून असे वक्तव्य करता येत नाही. कारण, त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आमदारपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे विधानभवनात सभापतींसमोर घेतलेल्या शपथेचा व गोपनियतेचा भंग आणि उल्लंघन होत आहे. आमदार लांडगे यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर रासुका खाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या वतीने देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर रिपाइं (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे, विभागीय महासचिव अरूण बनसोडे, जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बादल तरकसे, शेरूभाई पठाण (शहराध्यक्ष, अंबाजोगाई), जिल्हाप्रसिद्धीप्रमुख सुजीत वेडे, ऋतिकेश क्षीरसागर (सर्कल अध्यक्ष, चनई), गणेश उपाडे, शंकर उजगरे, लक्ष्मण जोगदंड आदींनी दिला आहे.

कारवाई न झाल्यास पुतळ्याचे दहन करणार :
आमदार महेश लांडगे यांनी नुकतेच आहिल्यानगर येथे हिंदू जनसभेमध्ये भाषण करताना मला विशिष्टांची मते नको आमदारकीला पडलो. तरी चालेल असे जाहिर सभेमधून वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यामुळे भविष्यात हिंदू – मुस्लिम समाज एकमेकांसमोर येऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या संदर्भात कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करणार.

~ अक्षय भुंबे,
मराठवाडा विभागीय अध्यक्ष, रिपाइं (खरात गट)


Related Posts :

Categories

Recent Posts