Breaking

अंबाजोगाईत ११०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयासाठी १०२ कोटींचा निधी मंजूर; आ. नमिता मुंदडा यांचा यशस्वी पाठपुरावा

Updated: मार्च 6, 2026

By Vivek Sindhu

आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ११०० खाटांचे नवीन अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासू पाठपुराव्याला यश आले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा विस्तार होणार असून स्थानिक नागरिकांना हक्काच्या ठिकाणी दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. या रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती आणि विशेषतः हृदयविकार व कॅन्सरवरील उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या येथे एंजिओग्राफी सुविधा सुरू झाली असून लवकरच पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्टची सेवाही उपलब्ध होईल. या मोठ्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधित मंत्र्यांचे आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts