Breaking

बीड बसस्थानक परिसरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; गांधी नगर भागातील नौशादचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Updated: मार्च 6, 2026

By Vivek Sindhu

गांधी नगर भागातील नौशादचा मृतदेह आढळल्याने खळबळ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरातील अत्यंत गजबजलेल्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस शुक्रवारी सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गांधी नगर परिसरातील नौशाद असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याचा खून झाल्याची प्राथमिक चर्चा परिसरात वर्तवली जात आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झाले नसले तरी, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. भरवस्तीत अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी आता प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहे.


Related Posts :

Categories

Recent Posts