Breaking
Updated: सप्टेंबर 9, 2025
गेवराईत नात्यातील वादातून घरात घुसून हल्ला, तीन जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : जमीनविवादाच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील मयारवाडी येथे तब्बल अकरा जणांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात घरमालक एकनाथ बाबासाहेब बरगे, त्यांची पत्नी मराबाई आणि सुन शारदा जखमी झाले. ही घटना 8 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला
एकनाथ बरगे (वय 60, रा. मयारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतातील रस्त्याच्या कारणावरून आधीपासूनच वाद सुरू होता. 7 सप्टेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत तो वाद मिटवण्यात आला होता. तरी 8 सप्टेंबर रोजी रात्री मयारवाडीतील माऊली नारायण बरगे, मदन विठोबा डिंगरे, रखमाजी मदन डिंगरे, राहुल संजय बरगे, संजय केशव बरगे, नारायण केशव बरगे, अजित पंडित घाडगे, लक्ष्मी नारायण बरगे, भैय्या लक्ष्मण नावडे, बाळासाहेब कडुदास बरगे व अकुंश कडुदास बरगे यांनी हातात काठ्या-दगड घेऊन फिर्यादीच्या घरात घुसून हल्ला केला.
या दरम्यान राहुल संजय बरगे याने एकनाथ बरगे यांच्या डाव्या हातावर काठीने वार करून जखमी केले. माऊली नारायण बरगे याने सुन शारदा हिच्या हातावर काठी मारून दुखापत केली, तर रखमाजी मदन डिंगरे याने मराबाई हिच्या हातावर काठीने प्रहार केला. गावकऱ्यांनी धाव घेऊन सोडवणूक केली, मात्र आरोपींनी पुन्हा शेतात रस्ता मोकळा न केल्यास जीव घेण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार सुंदर नामदेव राठोड यांच्याकडे आहे.