Breaking
Updated: मे 6, 2026
बीड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार 2026' प्रदान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : – येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सोमवार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडला महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२६’ मध्ये कायदेशीर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना ‘किसान कृषीरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.श्रीमती ज्योतीताई मेटे (अध्यक्षा, शिवसंग्राम) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ॲड वांजरखेडे यांनी सर्वसामान्यांमध्ये कायदेशीर जागृती निर्माण व्हावी म्हणून शेती असोत किंवा कौटुंबिक कायदे किंवा चेक बाऊन्स अश्या विविध कायद्यातील क्लिष्टता सोप्या भाषेत मांडून त्यांचे या विषयावरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रकाशित झाले आहे तसेच कृषी विभागाच्या शेतकरी मासिकात सुद्धा त्यांचे लेख प्रकाशित होत असतात तसेच मोडी लिपी लिप्यंतरकार महाराष्ट्र शासन प्रमाणित असल्याने जुन्या मोडी लिपीतील कागदपत्रांचे लिप्यंतर करून अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे सुद्धा ते शेती कायदे असोत किंवा अन्य कायदेशीर जागृतीबाबत काम करतात तसेच शाळा, महाविद्यालय, येथे जाऊन सुद्धा कायदेविषयक मार्गदर्शन केलेलं आहे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुद्धा त्यांनी शेती विषयक वाद मध्यस्थीने व सामंजस्याने सोडवले आहेत त्यांच्या याच बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.
हे कृषी प्रदर्शन दिनांक १ मे ते ५ मे या कालावधीत संपन्न झाले यामध्ये कृषी उत्पादनांचे एकूण ३०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत.भारतातील सर्वात मोठा सरडा (इग्वाना) हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.तज्ज्ञांची पीकविषयक चर्चासत्रे आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांचे स्वतंत्र दालन येथे उपलब्ध आहे. एक दिवसीय पशु प्रदर्शन आणि डॉग शो चे देखील आयोजन करण्यात आले आहे. थेट उत्पादकांकडून ग्राहकांना विक्रीसाठी धान्य महोत्सव सुरू आहे.
या सोहळ्यास जिल्ह्यातून उपस्थित असंख्य शेतकरी बांधव तसेच विविध वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संयोजक महेश बेद्रे यांनी केले.