Breaking

टेम्पो चोरणारी टोळी जेरबंद

Updated: मे 5, 2026

By Vivek Sindhu

टेम्पो चोरणारी टोळी जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चारचाकी वाहन चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

अश्पाक अनिमोद्दीन जुलहा रा. मोमीनपुरा, पेठ बीड यांचा अशोक लेलँड कंपनीचा टॅम्पो बार्शी रोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दि.१० एप्रिल २०२६ रोजी चोरून नेला. त्यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे आरोपी लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने लातूर येथे सापळा रचून आरोपी तैबाज सलीम शेख (वय २५), रा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर व रेहान इलाही शेख (वय १९) रा. चांदनगर, साईनाका, अंबाजोगाई रोड, लातूर यांना ताब्यात घेतले.आरोपींकडून चोरीस गेलेला अशोक लेलँड टॅम्पो जप्त करण्यात आला असून पुढील चौकशीत त्यांनी विवेकानंद पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नं. 207/2026 अंतर्गत पिकअप चोरी केल्याची कबुली दिली आहे.दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पेठबीड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलीस करत आहेत सदरील कामगिरी मा.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह मारुती कांबळे, बाळु सानप,सोमनाथ गायकवाड, युनुस बागवान, पोशि अश्पाक सय्यद, मनोज परजणे, आश्विन सुरवसे व चालक अतुल हराळे यांनी केली आहे.


Categories

Recent Posts