Breaking

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य निर्माण झाले पाहिजे- गणेश लोमटे

Updated: मे 6, 2026

By Vivek Sindhu

रोटरीचा युवा विकास कार्यक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रोटरीचा युवा विकास कार्यक्रम

अंबाजोगाई-: विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, टीमवर्क तसेच करिअर विषयक जागरूकता निर्माण व्हावी.
असे आवाहन प्रसिद्ध वक्ते गणेश लोमटे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने रोटरी युवा विकास कार्यक्रम अंतर्गत युवा नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवकांमध्ये नेतृत्व विकासाची गरज, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि योग्य करिअर मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शन करत “आजचा विद्यार्थी हाच उद्याचा सक्षम नेता आहे,” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी प्रा. रमेश सोनवळकर,अमृत महाजन, प्रा. संतोष मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी मधील ७० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नेतृत्व विकासाच्या या उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक यांनी केले.
या कार्यक्रमास धनराज सोळंकी (उपाध्यक्ष), मंजुषा जोशी (सचिव), राधेश्याम लोहिया (सहसचिव), l अजित देशमुख (प्रकल्प अध्यक्ष) यांच्यासह अनेक रोटरी सदस्य, पालक, शिक्षक व व विद्यार्थी उपस्थित होते.


Categories

Recent Posts