Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
बनावट रेशनकार्ड दाखवून चक्क पोलिसांचीच दिशाभूल; गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : तालुक्यातील रूई येथे शनिवारी रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन आरोपींनी साक्षीदाराला लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करीत जखमी केले तसेच जीव मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सतिष आप्पासाहेब नवले (वय २७, रा. रूई, ता. गेवराई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजता त्यांच्या घरासमोर आरोपी सुरेंद्र उर्फ संभाजी राम नवले व राम मुरली नवले (दोन्ही रा. रूई, ता. गेवराई, जि. बीड) यांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांनी फिर्यादीला म्हणाले की “सिद्धेश्वर मनोहर दळवी याच्याशी आमचे भांडण असताना तू का सोडवणूक केलीस आणि त्याच्या खटल्यात साक्ष का दिलीस?” असे म्हणून त्यांनी लोखंडी रॉडने लाकडी बेदम मारहाण केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व चापट्यांनी मारहाण करत “जर आमच्या नादी लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.
या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सफौ डोंगरे करत आहेत.