Breaking
Updated: ऑगस्ट 30, 2025
नेकनूरात दोन बिअर बार फोडून ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : गेवराई तालुक्यातील चोपड्यांचीवाडीचे सरपंच लहानु देविदास चिलगर यांच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपड्यांचीवाडीचे सरपंच लहानु देविदास चिलगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास ते मोटरसायकलवरून चोपड्यांचीवाडी येथे जात होते. टाकरवण गावातील पटेकर यांच्या धाव्याच्या पश्चिम बाजूस रस्त्यावर पोहोचताच आरोपी दत्तप्रसाद राजेंद्र कोळेकर (रा. चोपड्यांचीवाडी, ता. गेवराई) याने जुन्या भांडणाची कुरापत काढत त्यांना अडवले.
यावेळी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपीने त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हातातील बाटलीने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली आणि शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करत आहेत.