Breaking

तलवारीसह एकाला घेतले ताब्यात; दिंद्रुड पोलिसांची कारवाई

Updated: ऑगस्ट 27, 2025

By Vivek Sindhu

परळीत तरुणाकडून धारदार तलवार जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव : दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेच्या कारवाईत तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतला असून त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. ही कारवाई 26 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास संगम फाटा येथे करण्यात आली.

पोलिस नाईक युवराज श्रीडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने संगम शिवारात छापा टाकला. पोलिसांना पाहून दोन अनोळखी इसमांपैकी एकाने पळ काढला तर दुसऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख तोफिक शेख युनूस (रा. इंदिरानगर, पाथरी, जि. परभणी) असे सांगितले. पळून गेलेल्या इसमाचे नाव रवी भास्कर पवार (रा. सागर कॉलनी, पाथरी, जि. परभणी) असल्याचे उघड झाले. ताब्यात घेतलेल्या शेख तोफिक याच्या अंगझडतीत पंचासमक्ष एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी शेख तोफिक शेख युनूस व रवी भास्कर पवार यांच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस करत आहेत.


Categories

Recent Posts