Breaking

हिवरा येथील शेतातून पाण्याची मोटार व वायरची चोरी

Updated: ऑगस्ट 19, 2025

By Vivek Sindhu

हिवरा येथील शेतातून पाण्याची मोटार व वायरची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव : तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथील शेतातून अज्ञात चोरट्याने पाण्याची मोटार व वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत माणिकराव तारू (वय ३८, रा. हिवरा बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता ते दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या बटईच्या शेतातील शेतमालक सविता तौर यांच्या मालकीच्या शेतातून ३ एचपी क्षमतेची अजंटा कंपनीची वापरती पाण्याची मोटार (किंमत अंदाजे १३,२३० रुपये) व ८० फुट ४ एमएम कॉपर वायर (किंमत अंदाजे २,३२० रुपये) असा एकूण १५,५५० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरला आहे.

सदर फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


Categories

Recent Posts