Breaking

अनधिकृत बॅनरबाजीला बसणार चाप; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले कारवाईचे आदेश

Updated: ऑगस्ट 12, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 08 12 at 15.16.35 6bbd375f

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : सार्वजनिक ठिकाणी राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर लावण्यात येणाऱ्या फलक व बॅनर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कडक आदेश जारी केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य शासनाच्या निर्देशांच्या आधारे हे आदेश देण्यात आले असून, अनधिकृत बॅनर्सवर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे की, फलक व बॅनर्सवरील मजकूर हा धार्मिक, जातीय, पंथीय भावना भडकवणारा, द्वेष निर्माण करणारा किंवा समाजात तेढ निर्माण करणारा असता कामा नये. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे मजकूर किंवा फोटो टाळावेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी कोणताही बॅनर लावण्यापूर्वी संबंधित मजकुराची काटेकोर पडताळणी करूनच परवानगी द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

तसेच, परवानगीशिवाय लावलेले बॅनर्स हे अनेकदा वादाचे कारण ठरत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे किंवा जमावबंदीची परिस्थिती निर्माण करणारे बॅनर्स त्वरित हटवावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालयाचे आदेश, राज्य शासनाच्या पत्रातील निर्देश आणि प्रचलित नियमांचे काटेकोर पालन करूनच पुढील कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


Categories

Recent Posts