Breaking

ट्रकमधून शेंगदाण्याचे कट्टे लांबविले

कोदरीत किराणा दुकानातून २ हजाराचा गुटखा पकडला

WhatsApp Group

Join Now

केज – केज – मांजरसुंबा रस्त्यावरील टोलनाक्याजवळ चालत्या ट्रकवर चढून अज्ञात चोरट्यांनी २६ हजार पाचशे रुपयांचे शेंगदाण्याचे ५ कट्टे लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राजस्थान राज्यातील बिरामसर (ता. नौका जि. बिकानेर) येथील ट्रक चालक – मालक छगनलाल मोहनलाल चौधरी हे बिकानेर येथून ४०० शेंगदाणा कट्टे ट्रकमध्ये (आर. जे. ०७ जी. बी. ३८१७) भरून लातूरकडे निघाले होते. ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता मांजरसुब्याकडून केज मार्गे लातूरकडे जात असताना उमरी फाट्याजवळील टोलनाक्याजवळ अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडून ट्रकमधील २६ हजार पाचशे रुपयांचे शेंगदाण्याचे ५ कट्टे लंपास केले. ट्रक चालक छगनलाल चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार फुलचंद सानप हे करीत आहेत.

Last Updated: July 5, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.