Breaking

पैशांच्या कारणावरून महिलेला लोखंडी गजाने मारहाण; चार जणांवर गुन्हा

Updated: जून 2, 2026

By Vivek Sindhu

पैशांच्या कारणावरून महिलेला लोखंडी गजाने मारहाण; चार जणांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यातील कोकरेवाडी येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून एका महिला शेतकऱ्याला लोखंडी गजाने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकरेवाडी येथील रहिवासी छबुबाई पोपट मोटे (वय ५०) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. २७ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पैशांच्या कारणावरून आरोपी अशोक दादा वाघमोडे, दादा भिवा वाघमोडे, पांडुरंग चंद्रकांत नरुटे आणि चंद्रकांत जबाजी नरुटे यांनी संगणमत करून छबुबाई यांना लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले. तसेच त्यांच्या मुलालाही चापटीने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीवर उपचार सुरू असल्याने अखेर १ जून रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तांदळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts