Breaking
Updated: जून 2, 2026
शेतातील वादातून महिलेला काठीने मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी: तालुक्यातील चिंचाळा तांडा येथे शेतात गवत पेटवल्याचा जाब विचारल्याने एका महिला शेतकऱ्याला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचाळा तांडा येथील रहिवासी निलाबाई मधुकर राठोड (वय ४५) या ३१ मे २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या गट नंबर २९५ मधील शेतात वाळलेली हरळी वेचत होत्या. यावेळी आरोपी विजय लालु राठोड आणि आशाबाई विजय राठोड यांनी शेतातील विहिरीजवळचे गवत पेटवून दिले. एवढ्या उन्हात गवत का पेटवले, असा प्रश्न निलाबाई यांनी विचारला असता आरोपींनी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. विजय राठोड याने काठीने मारून निलाबाई यांच्या डाव्या हाताचे बोट जखमी केले, तर आशाबाईने चापटबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. १ जून रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार सिद्दीकी पुढील तपास करत आहेत.