Breaking
Updated: जून 2, 2026
झोपेत शेतकऱ्याच्या डोक्यात दगड मारला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून झोपलेल्या एका ३८ वर्षाच्या शेतकऱ्याच्या डोक्यात दगड मारल्याने जखमी झाल्याची घटना लव्हुरी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लव्हुरी येथील शेतकरी गणेश विक्रम चाळक (वय ३८) यांनी शेतात काम करण्यासाठी गावातील प्रदीप चंद्रकांत कांबळे यास शेतात काम करण्यासाठी साडेचार हजार रुपये दिले होते. त्यावरून त्यांच्यात अडीच महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्या भांडणाचा राग मनात धरून प्रदीप कांबळे याने २९ मे रोजी रात्री ११.३० वाजता शेतातील घराच्या कंपाउंडमध्ये झोपले असता अचानक येऊन दगड डोक्यात मारून पळून गेला. त्याला दगड मारून जाताना गणेश चाळक यांनी पाहिले. त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचार घेऊन त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर गणेश चाळक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप कांबळे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार हनुमान मुंडे हे तपास करीत आहेत.