Breaking
Updated: जून 2, 2026
केज येथे दोन टेम्पोच्या २० हजाराच्या बॅटऱ्या चोरल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelदोघे जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
केज – दोन टेम्पोच्या २० हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना केज शहरातील कुरेशी मोहल्ला भागात उघडकीस आली. तर दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून एकाची ओळख पटली आहे.
केज शहरातील रोजा मोहल्ला दर्गा रोड भागातील टेम्पो चालक मुन्नावर महेबूब शेख व त्यांचा भाऊ अजहर शेख हे दोघे भाड्याने टेम्पो चालवून उपजीविका भागवितात. त्या भावांनी ३० मे रोजी सायंकाळी सहा वाजता घराच्या बाजूला कुरेशी मोहल्ला दर्गा रोडवर टेम्पो (एम. एच. १४ बी जे ०६५८) व टेम्पो (एम. एच. २६ एडी १५५६) हे दोन टेम्पो उभे केले होते. ३१ मे रोजी पहाटे ४.४५ वाजेच्या दोन्ही टेम्पोच्या प्रत्येक १० हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. दरम्यान, सीसीटीव्ही दर्गा रोड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सि.सि.टि.व्ही. कॅमेरे चेक केले असता त्यांच्या गल्लीच्या पाठीमागील गल्लीत राहणाऱ्या सलमान पठाण (रा. केज) व त्याच्यासोबत अनोळखी एक जण असे दोघे जण टॅम्पोच्या बॅटऱ्या चोरी करून घेऊन जात असताना दिसून आले. टेम्पो चालक मुन्नावर शेख यांच्या फिर्यादीवरून सलमान पठाण व अनोळखी एक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जमादार महावीर सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.