Breaking

दासखेड येथे ९० हजारांच्या शेळ्यांची चोरी

Updated: जून 2, 2026

By Vivek Sindhu

चाकूचा धाक दाखवून दांपत्याला लुटले; धारूरच्या दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: तालुक्यातील दासखेड येथे अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या बंदिस्त शेडमधून ९० हजार रुपये किमतीच्या बिटर जातीच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दासखेड येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी अशोक बाळासाहेब कोकाटे (वय २९) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. ३० मे २०२६ रोजी पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडची जाळी उघडून आत प्रवेश केला. चोरट्याने शेडमध्ये बांधलेल्या बिटर जातीच्या तीन शेळ्या, दोन बोकड आणि एक पाठ असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. या घटनेनंतर कोकाटे यांनी १ जून रोजी पाटोदा पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार सारुक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts