Breaking

किरकोळ कारणावरून घरात घुसून अपंग मुलीसह कुटुंबाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Updated: जून 2, 2026

By Vivek Sindhu

किरकोळ कारणावरून घरात घुसून अपंग मुलीसह कुटुंबाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील आम्ला वाहेगाव येथे मोटरसायकल उभी करण्याच्या किरकोळ कारणावरून आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका कुटुंबाला घरात घुसून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, १ जून रोजी रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली.

गुलाब इशामुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गहिनीनाथ मच्छिंद्र धायगुडे, मच्छिंद्र तुकाराम धायगुडे आणि गोरक्षनाथ मच्छिंद्र धायगुडे (सर्व रा. आम्ला वाहेगाव) यांनी फिर्यादीच्या घरासमोर मोटरसायकल उभी करण्यावरून वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी घरात घुसून गुलाब शेख, त्यांची पत्नी आणि त्यांच्या अपंग मुलीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. या दरम्यान आरोपी गहिनीनाथ धायगुडे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने गुलाब शेख यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मेडिको लीगल केस (एमएलसी) अहवाल प्राप्त झाल्यानंतर तलवडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार डोंगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts