Breaking

नगर-जामखेड महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

नगर-जामखेड महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: नगर-जामखेड महामार्गावरील धानोरा येथील संतोषीमाता चौकात भरधाव पिकअपच्या धडकेत एका ४५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विष्णू पोपटराव शेळके असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या सुझुकी सुपर कॅरी गाडीच्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ राहुल दादासाहेब शेळके यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालक नारायण छगन खोसे (रा. गिरवली पिपरखेड, ता. जामखेड) याच्याविरुद्ध हयगयीने वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गर्जे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts