Breaking
Updated: ऑगस्ट 18, 2025
सर्जा राजाला बैलपोळा सणानिमित्त सजवण्यासाठी बळीराजा सज्ज
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- परंपरा आणि संस्कृती जपणार्या बैलपोळा सणाची धामधूम ग्रामीण भागात सुरू झाली असून शेतकर्याचा खरा सोबती आणि शेतातील आधारवड मानल्या जाणार्या बैलांची विशेष सजावट करून सर्जा-राजाला बैलपोळा सणानिमित्त सजवण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे.
यंदा अंबाजोगाई तालुक्यासह जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे बैलपोळा सण यंदा दणदणीत उत्साहात साजरा होणार आहे. शेतकर्याच्या कष्टाला आणि त्या जिवाभावाच्या सोबत्याला बैलाला मान देणारा हा सण ग्रामीण भागात उत्सवाच्या जल्लोषात पार पडणार आहे. बैलपोळा सण हा केवळ बैलांचा सण नसून शेतकरी आणि बळीराजा यांच्यातील नात्याचा उत्सव आहे. पारंपरिक गाणी, लेझीम, ढोल-ताशे आणि गावोगाव निघणार्या मिरवणुकीतून या सणाची शोभा वाढते.
बैलपोळ्याच्या या सणात बळीराजा आणि शेतकरी यांचे अतूट नाते अधिक दृढ होते. सर्जा-राजासह सजवलेल्या बैलांची गावोगावी निघणारी मिरवणूक हा ग्रामीण संस्कृतीचा जिवंत वारसा ठरतो.
पावसाने यंदा चांगली साथ दिल्यामुळे खरीप हंगाम चांगला सुरू आहे. त्यामुळे यंदाचा बैलपोळा अधिक जल्लोषात आणि समाधानात साजरा करू, असे अनेक शेतकरी आनंदाने सांगत आहेत.