Breaking

तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर सरकारचा मोठा निर्णय; पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी जाहीर

Updated: मे 22, 2026

By Vivek Sindhu

तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर सरकारचा मोठा निर्णय; पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी जाहीर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. राकेश गिड्डे यांच्या निधनाला अवघा दीड महिना झाला असतानाच, सरकारने त्यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर तातडीने शासकीय सेवेत नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला.

सांगलीत मिळणार नियुक्ती
पतीच्या निधनानंतर नेहा गिड्डे यांनी बीडऐवजी सांगली येथे नोकरी मिळावी अशी विनंती प्रशासनाकडे केली होती. सरकारने त्यांची ही विनंती विशेष बाब म्हणून मान्य केली असून, त्यांना सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्र पुणे विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.

रेणापूर फाट्याजवळ झाला होता भीषण अपघात
९ एप्रिल रोजी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटली आणि कारमध्ये एकटेच असलेल्या राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे महसूल विभाग आणि बीड जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आधार देत हा नोकरीचा निर्णय घेतला आहे.


Categories

Recent Posts