Breaking
Updated: नोव्हेंबर 6, 2025
ऍलोपॅथी उपचार करताना रंगेहाथ पकडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : शहरातील गांधनपुरा येथे एका तरुणावर सहा जणांनी एकत्रित हल्ला करून चाकूने जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध मारहाण, धमकी आणि शस्त्रास्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शकील मिया कुरेशी (वय ४९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. गांधनपुरा, माजलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता त्यांचा भाचा मोहम्मद फैजान जमील कुरेशी हा गांधनपुरा परिसरात असताना आरोपी अरबाज बेग, मुर्तुज बेग, इमान बेग, अनिस बेग, अकबर बेग आणि आसेफ बेग (सर्व रा. गांधनपुरा) यांनी त्याच्यावर हल्ला केला.
प्रथम आरोपी अरबाज बेग याने मोटारसायकलने कट मारून वाद घातला आणि नंतर फोनवरून इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी मुर्तुज बेग याने चाकू काढून फैजानच्या दोन्ही पायांवर वार करून गंभीर दुखापत केली. तर इमान, अनिस, अकबर आणि आसेफ यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फैजान आणि जैद कुरेशी हे दोघे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोउपनि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.