Breaking
Updated: नोव्हेंबर 7, 2025
नाळवंडी शिवारात लोखंडी रॉडने हल्ला; पानशॉप मालक जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : नाळवंडी शिवारातील ढेकणमळ येथे ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जुन्या वादातून ज्ञानेश्वर पंढरीनाथ अवघड (व्यवसाय पानशॉप, रहिवासी कोल्हेर, तालुका गेवराई) यावर लोखंडी रॉडने वार करून त्याला डोक्याला गंभीर जखम केली. आरोपीने लाथाबुक्क्या व चापटांनी मारहाण केली आणि धमकी देऊन ‘तुला जिवेच मारून टाकीन’ असा इशारा दिला, अशी फिर्यादीत तक्रार आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपी क्रमांक १ कैलास रामभाऊ वाघमारे आणि आरोपी क्रमांक २ कविता प्रकाश वाघमारे (दोघे रहिवासी नाळवंडी) यांनी हे हल्ले केले. फिर्यादीला तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षींना शिवीगाळ केल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.