Breaking

भेंड टाकळी येथे नातेसंबंधातील वादातून तिघांकडून मारहाण; तलवाडा पोलिसांत गुन्हा

Updated: ऑगस्ट 13, 2025

By Vivek Sindhu

तलवाडा पोलिसांत गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई : नातेसंबंधातील वादातून तिघांनी संगनमत करून गावातील तीन जणांना लाकडी बांबू व लोखंडी गजाने मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीष एकनाथ वाव्हळ (वय ३७, व्यवसाय शेती, रा. भेंड टाकळी, ता. गेवराई) हे ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास भेंड टाकळी येथील बाजार तळावर असताना आरोपी छत्रभुज सर्जेराव वाव्हळ, शितल छत्रभुज वाव्हळ व प्रतीक छत्रभुज वाव्हळ (रा. भेंड टाकळी) यांनी “तू आमच्या नातेवाईकाचा वादविवाद का मिटवितोस” असा पवित्रा घेत भांडणाला सुरुवात केली.

यानंतर आरोपींनी फिर्यादी तसेच साक्षीदार सुमीत भारत वाव्हळ व प्रकाश एकनाथ वाव्हळ यांना लाकडी बांबू व लोखंडी गजाने कंबर, पाय व हातावर मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी कोरडे करत आहेत.


Categories

Recent Posts