Breaking
Updated: एप्रिल 20, 2026
केज तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पाची ३.५ लाखांची तार लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशिरूर कासार: तालुक्यातील वारणी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी आणि साक्षीदारांना जखमी केल्याप्रकारणी आठ जणांसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विष्णु नामदेव केदार (वय ४९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. वारणी ता. शिरूर कासार) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून जुन्या वादाच्या रागातून हल्ला केला. आरोपींनी गलोल, दगड, लोखंडी रॉड आणि मिरची पूड यांचा वापर करून फिर्यादीला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात संदीप बबन बर्डे, विनोद बबन बर्डे, गणेश सुनील गायकवाड, भारत यल्लपा फुलमाळी, दिलीप यल्लपा फुलमाळी, आदित्य धनवई, विकास चव्हाण आणि रील बनवणारा तुषार कानडे (सर्व रा. वारणी) यांच्यासह ओम लक्ष्मण गायकवाड, ऋषीकेश आणि अनिकेत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहेत.