Breaking

केज तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पाची ३.५ लाखांची तार लंपास

Updated: एप्रिल 20, 2026

By Vivek Sindhu

केज तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पाची ३.५ लाखांची तार लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: केज तालुक्यातील विडा ते लव्हरी दरम्यान सुरू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कामातून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ५० हजार रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनियम तार आणि इतर साहित्य चोरून नेले आहे. या चोरीमुळे प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण झाला असून केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नितीन अण्णासो कांबळे (वय २८ वर्षे, रा. कळंब) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ते आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीला आहेत. १० एप्रिल २०२६ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सर्वे नंबर २६९, २७० आणि २७१ मधील ११ लोखंडी पोलवरील अंदाजे १ ते १.५ किलोमीटर लांबीची अ‍ॅल्युमिनियम तार (डॉग आणि पॅथर कंडक्टर), हार्डवेअर आणि इन्सुलेटर चोरून नेले.

या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक शेष आणि त्यांची टीम करत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


Categories

Recent Posts