Breaking

दारूसाठी पैसे नाकारल्याने दोन भावांना बेदम मारहाण

Updated: एप्रिल 20, 2026

By Vivek Sindhu

दारूसाठी पैसे नाकारल्याने दोन भावांना बेदम मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

तलवाडा: गेवराई तालुक्यातील काजळ्याचीवाडी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून तीन जणांनी दोन भावांवर लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

डिगांबर उर्फ पप्पू जालिंदर खंडागळे (वय ३० वर्षे, रा. काजळ्याचीवाडी) यांनी याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा भाऊ घरी असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले, परंतु खंडागळे बंधूंनी नकार दिला. या रागातून आरोपी कृष्णा भास्कर बाबर याने लोखंडी गजाने मारहाण केली, तर वाल्मीक भास्कर बाबर आणि नारायण महादेव बाबर यांनी लाकडी दांडक्याने डोक्यावर प्रहार करून जखमी केले.

या हल्ल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तलवाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार डोंगरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts