Breaking

कौटुंबिक कार्यक्रमात वाद; तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: एप्रिल 20, 2026

By Vivek Sindhu

तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: शिरूर कासार तालुक्यातील भडकेल येथे एका घरगुती कार्यक्रमात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला समज दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी अंमळणेर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महादेव साहेबराव पुलावळे (वय २१ वर्षे, व्यवसाय शेती, रा. भडकेल) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महादेव यांच्या चुलत भावाचा कार्यक्रम १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपी चांगदेव लक्ष्मण साबळे हा दारूच्या नशेत तिथे गोंधळ घालत होता. फिर्यादीने त्याला “तुम्ही एका जागेवर बसा, गोंधळ घालू नका” असे म्हटले असता, आरोपीने संतापून हातातील लाकडी दांडक्याने महादेव यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.

या घटनेदरम्यान आरोपी जालिंदर लक्ष्मण साबळे आणि जिजाबाई लक्ष्मण साबळे (सर्व रा. भडकेल) यांनीही फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “जर आमच्या नादाला लागला तर तुला जिवे मारून टाकू,” अशी धमकीही आरोपींनी यावेळी दिली. अंमळणेर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.


Categories

Recent Posts