Breaking
Updated: मे 26, 2026
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चोरट्या दारू विक्री विरुद्ध कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज:- केज येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व चोरट्या दारू विक्री विरुद्ध कारवाई करुन मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दि. २५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बंटेवाड यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, पोलिस कॉन्स्टेबल महेश घोडके, पोलिस कॉन्स्टेबल जोगदंड आणि वाहन चालक मराडे हे केज पोलिस ठाणे हद्दीत अवैध्य धंद्यावर कारवाई करणेसाठी गस्त घालीत असताना त्यांना एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, येथील केज मांजरसुंबा रोड लगत टाकळी फाट्या जवळ असलेल्या येरमाळा मच्छी हॉटेलच्या बाजुला पत्राच्या शेड लगत मोकळ्या जागेत रमाकांत मुरलीधर काळे हा विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारुची चोरटी विक्री करत आहे. माहिती मिळाल्या नंतर दि. २५ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, पोलिस कॉन्स्टेबल महेश घोडके, पोलिस कॉन्स्टेबल जोगदंड आणि वाहन चालक मराडे यांनी छापा टाकला असता त्या वेळी रमाकांत मुरलीधर काळे याने विनापरवाना व बेकायदेशीररीत्या चोरटी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याने विक्रीसाठी ठेवलेल्या टँगो पंच आणि बॉबी संत्रा दारूच्या २३२० रु. किमतीच्या ९१ बाटल्या ताब्यात घेतल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून रमाकांत काळे याच्या विरुद्ध गु. र. नं. ३१८/२०२६ दारूबंदी अधिनियमाचे कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलिस कॉन्स्टेबल संगिता हणवते या पुढील तपास करीत आहेत.