Breaking

ढाकेफळ शिवारात टेम्पोची कारला धडक; कार चालक तरुण गंभीर जखमी 

Updated: मे 25, 2026

By Vivek Sindhu

ढाकेफळ शिवारात टेम्पोची कारला धडक ; कार चालक तरुण गंभीर जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- केज अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ जवळ भरधाव टेम्पोने कारला जोराची धडक दिल्याने या झालेल्या भीषण अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.

दि. २३ मे रोजी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील प्रणव सचिन देशमुख हे त्यांच्या कार क्र. (एम एच- २४/ए एफ-१३०८) ने लातूरला नातेवाईकांना भेटण्यास गेले होते. ते परत २४ मे रोजी मध्यरात्री १:०० ते १:३० वाजेच्या दरम्यान येत असताना केज – अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ शिवारात दाजीबा हॉटेलच्या समोर केज कडून अंबाजोगाईकडे भरधाव वेगात निघालेल्या टेम्पो क्र. (एम एच- ४१/ ए यू-८३५८) ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात कार चालक प्रणव देशमुख यांच्या डोक्यास, मांडीस व खांद्याला गंभीर मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातातील गंभीर जखमी असलेले देशमुख हे बेशुद्ध अवस्थेत आहेत. 

अपघातात कारचे समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले असून टेम्पो चालक फरार झाला आहे. जितेंद्र विजयसिंह देशमुख यांच्या फिर्यादी वरून सदरील टेम्पोच्या चालका विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जमादार केशव खाडे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts