Breaking
Updated: मे 26, 2026
अंबाजोगाईत गोट फार्मची जाळी कापून शेळ्यांची चोरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोकळ्या जागेत कत्तल करण्याच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवलेला गोवंशीय बैल पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी एका अज्ञात इसमाविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पेठ बीड पोलीस ठाण्याचे अंमलदार अल्ताफ अमीन शेख हे सहकाऱ्यासह ‘डायल ११२’ च्या कर्तव्यावर असताना त्यांना एका कॉलरकडून गुप्त माहिती मिळाली. मोहम्मदीया कॉलनीतील पाशा किराणा दुकानाच्या जवळील मोकळ्या जागेत एक गोवंशीय जनावर कत्तल करण्यासाठी आखूड दोरीने बांधून ठेवल्याचे माहितीदाराने सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी तेलगाव नाका बीटचे हवालदार कालिदास खवले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.
त्या ठिकाणी साधारण दोन वर्षे वयाचा, पांढऱ्या रंगाचा खिलार जातीचा गोरा (बैल) चारा-पाण्याविना अत्यंत क्रूरतेने बांधलेला आढळला. पोलिसांनी स्थानिक लोकांकडे चौकशी केली, परंतु जनावराच्या मालकाबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. अखेर पोलिसांनी पंचांसमक्ष ३० हजार रुपये किमतीचा हा बैल जप्त केला. पोलीस अंमलदार अल्ताफ शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून हवालदार कालिदास खवले पुढील तपास करत आहेत.