Breaking

सिरसदेवीत अवैध गांज्याच्या साठ्यावर कारवाई

Updated: एप्रिल 21, 2026

By Vivek Sindhu

सिरसदेवीत अवैध गांज्याच्या साठ्यावर कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई – तालुक्यातील सिरसदेवी येथे एक इसम गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच सोमवार (दि.२०) रोजी कारवाई करत २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून आहे.

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे एक इसम गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहे.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळताच या माहितीची खातरजमा करून कारवाईचे आदेश देण्यात आले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तलवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने सिरसदेवी येथे छापा टाकला. या कारवाईत शेख रईस शेख युसूफ (वय २५) रा. सिरसदेवी याच्या घरातून ८ किलो ८८८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे २,६६,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा काण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सुशांत सुतळे, पोह.आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, चा.पोह अतुल हराळे व पोस्टे गेवराई येथील सपोनि जंजाळ, पोउपनि अन्नलदास, पोह.देवकते,श्री.गडदे,श्री.जावळे,श्री.राठोड,श्री.जाधव व मपोअ.मदने यांनी केली.


Categories

Recent Posts