Breaking

अल्पवयीन मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा

Updated: एप्रिल 21, 2026

By Vivek Sindhu

जाब विचारला अन् तरुणावर विळ्याचा घाव घातला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पिंपळनेर: ट्रॅक्टर चालवता येत नसताना आणि चालक परवाना नसतानाही अल्पवयीन मुलाला मजुरीच्या कामासाठी ट्रॅक्टर चालवण्यास दिल्याने झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक प्रविण शिंदे आणि सुशील सोनाजी लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाळू सर्जेराव लांडगे यांचा मुलगा कार्तिक हा अल्पवयीन होता. हे माहिती असतानाही आरोपींनी १६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्याला कामासाठी नेले आणि ट्रॅक्टर चालवण्यास दिले. अंबावन पिंप्री तांडा शिवारात हा अपघात घडला, ज्यात कार्तिकचा मृत्यू झाला. मयत कार्तिक हा १७ वर्षांचा असून तो गुंदा येथील रहिवासी होता. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार शेख तपास करत आहेत.


Related Posts :

Categories

Recent Posts