Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
दारूसाठी २०० रुपये दिले नाहीत म्हणून लोखंडी पाईपने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून एका तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना चाकरवाडी येथे घडली आहे. गोकुळ रामदास चौधरी यांनी या प्रकरणी रमेश केरवा पवार, अशोक रमेश पवार आणि विकास रमेश पवार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
१९ एप्रिल रोजी दुपारी फिर्यादी हॉटेलवर असताना आरोपींनी त्यांच्याकडे २०० रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपी रमेश पवार याने लोखंडी पाईपने गोकुळ यांच्या डोक्यात आणि खांद्यावर प्रहार केला. इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.